ट्रम्प यांच्या १८ रॅलीतून तब्बल ३० हजार जणांना कोरोनाचा धोका! | पुढारी

ट्रम्प यांच्या १८ रॅलीतून तब्बल ३० हजार जणांना कोरोनाचा धोका!

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या संकट काळात अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सत्ताबदलाचे संकेत मिळू लागले असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं हजारो लोकांना महागात पडण्याची शक्यता आहे. तब्बल ३० हजार जणांना कोरोनाची लागण आणि ७०० जणांवर मृत्यू ओढवण्याची भिती सॅनफोर्ड विद्यापीठाच्या रिसर्चमधून समोर आली आहे. 

वाचा ; शरद पवारांप्रमाणेच ज्यो बायडेन यांनाही पावसातील सभा लाभणार? ट्रम्प यांच्याविरोधात आघाडीवर!

सॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी २० जून ते २२ सप्टेंबरदरम्यान १८ रॅली काढल्या आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ७०० जणांचा मृत्यू होऊ शकतो असे स्टॅनफोर्ड विद्यापीठाने म्हटले आहे. 

वाचा ; WHO प्रमुख झाले होम क्वारंटाईन!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सत्ताबदलाचे संकेत मिळू लागले आहेत. अध्यक्षीय निवडणुकीच्या सर्वेक्षणात डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांनी प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. एका सर्वेक्षणात ५२ टक्के मतदारांनी डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बिडेन यांना मतदान केल्याचे सांगितले, तर ४४ टक्के लोकांनी अध्यक्ष ट्रम्प यांना पाठिंबा दर्शविला. त्यामुळे बायडेन ८ टक्क्यांनी पुढे आहेत. दोन टक्के लोकांनी तिसर्‍या उमेदवाराला मतदान केले आहे आणि दोन टक्के लोकांनी अद्याप कोणाला मतदान देणार याचा निर्णय घेतलेला नाही.

Back to top button