RR vs RCB : रविचंद्रन अश्विननं रचला इतिहास, १५० विकेटसचा टप्पा पार, हरभजन सिंगलाही टाकले मागे | पुढारी

RR vs RCB : रविचंद्रन अश्विननं रचला इतिहास, १५० विकेटसचा टप्पा पार, हरभजन सिंगलाही टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये १५० विकेटसचा टप्पा पार केला आहे. राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्यात रजद पाटीदारला बाद करत अश्विनने हा विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात अश्विनने ४ षटकांमध्ये १७ धावा देत ३ बळी घेतले.

अश्विनने पाटीदार पाठोपाठ सुयश प्रभुदेसाई आणि शाहबाज अहमदलाही बाद केले. अश्विनने केलेल्या या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान विजय संपादन केला. रविचंद्रन अश्विन आयपीएलमध्ये १५० बळी पटकावणारा आठवा गोलंदाज ठरला आहे. तर आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने १५० बळींचा टप्पा पार करण्यासाठी सर्वांत जास्त १७५ सामने खेळले आहेत. लसिथ मलिंगाने १०५ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. (RR vs RCB)

हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारला टाकले मागे (RR vs RCB)

रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये सर्वांत जास्त बळी घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. अश्विन आयपीएलमध्ये १५२ बळी घेतले आहेत. यापुर्वी हरभजन सिंगने १५० बळी घेतले होते. तर भुवनेश्वर कुमारने १५१ बळी घेतले आहेत.  आयपीएलमध्ये सर्वांत जास्त बळी घेण्याच्या विक्रम चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये १८१ बळी घेतले आहेत. (RR vs RCB)

याअगोदर परागच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने २० षटकांअखेर १४४ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर राजस्थाने आक्रमक गोलंदाजी करत आरसीबीला सर्वबाद ११५ धावांवर रोखले. अश्विनने आरसीबीच्या ३ फलंदाजांना माघारी धाडत राजस्थानला विजय मिळवून दिला.  (RR vs RCB)

हेही वाचलतं का?

Back to top button