पिंपरी : रस्ते खोदल्याने नागरिकांचे हाल | पुढारी

पिंपरी : रस्ते खोदल्याने नागरिकांचे हाल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विविध विकासकामांसाठी संपूर्ण शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदकामे सुरु आहेत; मात्र ही कामे संथगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास पादचार्‍यांना तसेच वाहन चालकांना होत आहे.

शहरातील विविध भागातील रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे अनेक रस्ते एकेरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. विविध कामांसाठी शहरात रस्ते खोदले जात असल्याचे सांगण्यात आले.

प्रियांका आणि निकच्या लेकीचं नाव आलं समोर

त्यासाठी खोदाई सुरू आहे. या कामांबरोबरच शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथांचीही कामे जोरात सुरू आहेत. खोदलेल्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दगड, माती तसेच उखडलेल्या पेव्हिंग ब्लॉकचे ढिगारे पदपथांवर पडलेले दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी पदपथांवर राडारोडाही पडला असल्याचे दिसून येते. त्यामुळे पादचार्‍यांना येथून ये-जा करताना कसरत करावी लागते. चिंचवड गावातील चापेकर चौक येथे रस्ता खोदल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी काम सुरू आहे.

पुणे : मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक

रावेत गावठाण ते किवळे या मार्गावर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम देखील संथगतीने सुरु असल्याने वाहन चालकांना त्रास होतो. राडारोड्यामुळे रास्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. महापालिकेकडून संबंधित रस्त्यांच्या कामाबाबत दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

अनेक दिवसांपासून चापेकर चौकातील रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. खूप दिवस झाले काम सुरु आहे.
-शाम पारगे, विक्रेते.

सकाळी कामावर जाताना; तसेच संध्याकाळी घरी येताना चौकात वाहतूक खोळंबली की, त्रास होतो. काही चालक विरुद्ध दिशेने येतात त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
-शोभा अकोले,स्थानिक रहिवासी

Back to top button