बारामती : अॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकीली सनद रद्द करा | पुढारी

बारामती : अॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकीली सनद रद्द करा

बारामती : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा कट रचणे, सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये करत सामाजिक शांतता बिघडविल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकीली सनद रद्द करावी, अशी मागणी बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे.

भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल; धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य

यादव यांनी यासंबंधी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला निवेदन दिले आहे. अॅड. सदावर्ते हे वकीली सनदेचा गैरवापर करत असल्याचे त्यात म्हटले आहे. प्रक्षोभक वक्तव्ये करत ते सामाजिक शांतता बिघडवत आहेत. शिवाय खासदार पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा कट रचल्याबद्दल पोलिसांनी नुकताच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची सनद रद्द करणे गरजेचे असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

न्यायव्यवस्थेवरील टीका भोवली : संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल

दरम्यान अॅड. सदावर्ते यांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या हाती मोटार देत ती ड्रायव्हींग करत असतानाचा व्हिडीअो शेअर केला होता. यादव यांनी यासंबंधीही अल्पवयीन मुलीच्या हाती मोटारीचे स्टेअरिंग सोपवत कायदा मोडणाऱ्या सदावर्ते दांपत्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यासाठी सदावर्तेंची मुलगी मोटार चालवतानाचा आणि सोबत तिचे गुणगाण करणाऱ्या सदावर्ते दांपत्याचा व्हीडीओ शेअर केला होता.

हेही वाचा

भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये : संजय राऊत

वाढत्या कोरोना केसेसमुळे दिल्लीत आता मास्क अनिवार्य होणार, न लावल्यास ५०० रुपये दंड

Russia Ukraine War : आता रशियाचे लक्ष्य पूर्व युक्रेन

Back to top button