नाशिक : आरम नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या मामा भाच्याचा बुडून मृत्यू | पुढारी

नाशिक : आरम नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या मामा भाच्याचा बुडून मृत्यू

सटाणा (जि.नाशिक), पुढारी वृत्‍तसेवा : सटाणा तालुक्यातील नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या मामा भाच्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दहिदुले येथे शुक्रवारी (दि. 15) रोजी घडली आहे. गणेश रामचंद्र जगताप (वय 32) व रोशन देवेंद्र बागुल (वय १८) मृत मामा भाच्याचे नावे असून दोघेही चापापाडा (देवपुर) येथील रहिवासी आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, केळझर धरणातून नदीपात्रात तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. नदीला पाणी आल्याने देवपूर येथील जगताप कुटुंबीय कारण नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेले होते. कपडे धुतल्यानंतर कुटुंब घरी निघालेले असताना गणेश जगताप व रोशन बागुल हे मामा-भाचे आंघोळीसाठी नदीपात्रावर थांबले होते. बंधाऱ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

गावचे पोलीस पाटील राजाराम साबळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सटाणा पोलीस ठाण्याचे कर्म-यांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्‍थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. सायंकाळी उशिरा दोन्ही मामा भाषांवर शोकाकुल वातावरणात देवपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

हेही वाचा  

Back to top button