‘डिझेलवर चालणाऱ्या रेल्‍वे गाड्यांमध्ये कोणतेही अतिरिक्त तिकिट वाढ नाही’ | पुढारी

'डिझेलवर चालणाऱ्या रेल्‍वे गाड्यांमध्ये कोणतेही अतिरिक्त तिकिट वाढ नाही'

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : डिझेलवर चालणाऱ्या रेल्‍वे गाड्यांमधून लांब पल्ल्याचा प्रवासासाठी प्रवाशांना जास्त भाडे आकारले जाणार नाही. अतिरिक्त अधिभार लावण्याची कोणतीही योजना रेल्वेकडून नाकारली आहे. भारतीय रेल्वेकडून याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर अधिभार लावण्याची कोणतीही योजना नाही. किंबहुना, पेट्रोलियम पदार्थांच्या सतत वाढणाऱ्या किमती दरम्यान डिझेलवरील गाड्यांच्या तिकिटांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असे वृत्त आले होते. यानंतर रेल्वे प्रशासनाने याला फेटाळले आहे.

दरम्‍यान, रेल्वे प्रशासनाने डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर हायड्रोकार्बन अधिभार (HCS) किंवा 10 ते 50 रुपये पर्यंत डिझेल कर आकारण्याची योजना आखली होती. डिझेल वापर करून अर्ध्याहून अधिक अंतरावर धावणाऱ्या गाड्यांवर अधिभार लागू होईल, असेही सांगण्यात आले होते. वाढत्‍या तेलाच्या किंमतीमुळे मोठा फटका बसलेल्या इंधन आयातीचा परिणाम कमी करण्यासाठी असे केले जात आहे. असे सांगण्यात आले हाेते.

तसेच, 15 एप्रिलपासून तिकिट बुकिंगच्या वेळी किंमतीत ते जोडले जाईल, असा अंदाजही वर्तवला जात होता. एसी क्लाससाठी 50 रुपये, स्लीपर क्लाससाठी 25 रुपये आणि इतर क्लाससाठी 10 रुपये असे किमान शुल्क तीन श्रेणींमध्ये अधिभार लावण्यात आल्याची अफवा होती. असे रेल्‍वे प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा  

Back to top button