नाशिक : तीन हजार पुस्तके वापरत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती (video) | पुढारी

नाशिक : तीन हजार पुस्तके वापरत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती (video)

नाशिक (चांदवड) : सुनिल थोरे ;

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. पुस्तकांसाठी भव्य असं घर बांधणाऱ्या या महामानवाने अवघे आयुष्य पुस्तक लिहिण्यात अन् वाचनात खर्ची केलं. देशाला परिपूर्ण संविधान देणाऱ्या महामानवाला अनोखे अभिवादन करण्यात आलं.

‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देत त्यांनी समाजाला वाचनाची प्रेरणा दिली. हाच धागा पकडत यंदाच्या जयंतीनिमित्त तब्बल तीन हजार पुस्तकांचा वापर करत बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आलीय. साडेपाच हजार चौरस फूट शालेय मैदानात शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव (ता. चांदवड) च्या प्रांगणात ही प्रतिकृती साकारण्यात आलीय. कला शिक्षक देव हिरे यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.

Back to top button