पुढारी अ‍ॅग्री पंढरी प्रदर्शन शुक्रवारपासून सुरू | पुढारी

पुढारी अ‍ॅग्री पंढरी प्रदर्शन शुक्रवारपासून सुरू

सांगली : पुढारी वृत्तसेवा

पुढारी माध्यम समूह आणि राज्य शासनाच्या सांगली जिल्हा कृषी विभागातर्फे उपक्रमशील आणि प्रयोगशील असलेल्या शेतकर्‍यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे पुढारी अ‍ॅग्री पंढरी हे प्रदर्शन कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, विजयनगर, सांगली-मिरज रोड सांगली येथे 15 ते 19 एप्रिल रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत होत आहे. आता मोजकेच स्टॉल्स शिल्लक आहेत.

‘ऑर्बिट क्रॉप सायन्स’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक, ‘रॉनिक स्मार्ट’, ‘दी कुटे ग्रुप’ सहप्रायोजक, तर ‘केसरी’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.
या प्रदर्शनामध्ये 50 पेक्षा जास्त लागवड केलेली पिके, खते, बी-बियाणे, औषधे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईपलाईन, वीज पंप, सोलर पंप, शेतीविषयक पुस्तके, शासकीय योजना, गांडूळ खत, मल्चिंग पेपर, शेततळे कागद, मंडपासाठी लागणारी तार, रोटावेटर, पॉवरटिलर, ट्रॅक्टर अशा अनेक प्रकारचे दोनशेंहून अधिक स्टॉल या प्रदर्शनामध्ये असणार आहेत.

कृषी क्षेत्रातील कंपन्यांना, शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक दाखविणे सोपे नसते. कारण कंपन्या आणि शेतकरी यांचा प्रत्यक्ष संपर्क फार कमी येतो. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन शेतीविषयक कंपन्यांना त्यांचे बियाणे, खते, औषधे व यंत्रसामुग्री यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी दैनिक पुढारी माध्यम समूहाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या ज्ञानात आणि कंपन्यांना प्रत्यक्ष येणार्‍या अडचणी यावर मात करता येणार आहे. त्यामुळे परिपूर्ण शेतीचा अभ्यास या प्रदर्शनामधून होणार आहे.

कृषी विकासासाठी अद्ययावत माहिती दररोज होणार्‍या व्याख्यानातून शेतकर्‍यांना मिळणार आहे. शेतकर्‍यांचा जमिनीकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन सकारात्मक करणारी ही व्याख्याने असतील.

दोडका, भेंडी, कारले, ढबू मिरची, कलिंगड, झेंडूची फुले आदींसह 50 वर नानाविध देशी-विदेशी पिकांचे बहरलेले प्लॉट प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9850844271 आणि 9766213003, 8805007148.

प्रदर्शनातील व्याख्याने…

  • दिनांक : 16 रोजी दुपारी 12.30 वा. विषय : एप्रिल द्राक्षे छाटणी व्यवस्थापन. वक्ते : मारुती चव्हाण.
  • दिनांक : 17 रोजी दुपारी 12.30 वा. विषय : हळद व आले उत्पादन वाढ व भविष्यातील संधी. वक्ते : जितेंद्र कदम.
  • दिनांक : 18 रोजी दुपारी 12.30 वा. विषय : एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान. वक्ते : डॉ. संजीव माने.

Back to top button