भंडारा : दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत एकजण ठार | पुढारी

भंडारा : दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत एकजण ठार

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : लाखनी तालुक्यातील लाखोरी शिवारातील लाखनी- सालेभाटा रोडवर उभ्या असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्यारेलाल महादेव येळेकर (वय ३५, रा. मासलमेटा ) असे मृताचे नाव आहे. तर रिंकेश केवळ बोरकर (वय ३३, रा. मासलमेटा) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, प्यारेलाल येळेकर हा आपली बजाज प्लॅटिना मोटरसायकलने (क्र. एमएच ३६/बी ७९६८) लाखनीकडून मासलमेटा येथे भरधाव जात होता. लाखोरी शिवारातील लाखनी- सालेभाटा रोडच्या कडेला मोटरसायकल (क्र. एमएच ४९/एजी २३८२) चा चालक रिंकेश बोरकर मोटरसायकलवर बसून गाडीचा स्टँड काढत होता. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या प्यारेलालने रिंकेशच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात रिंकेशच्या पायाला मार लागला. तर प्यारेलाल येळेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णलयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button