पिंपरी : ‘आप’ कार्यकर्त्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन | पुढारी

पिंपरी : ‘आप’ कार्यकर्त्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यशवंत कांबळे यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्यावतीने रविवारी जुनी सांगवीतील संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.

गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलीसही उचलण्याच्या तयारीत; ताबा मिळवण्यासाठी मुंबईत तळ ठोकला

जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, की देशात विकास विरोधी शक्ती जाणीवपूर्वक दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, तोडफोड करत आहेत. त्याचप्रकारे पिंपरी चिंचवडमध्येही समाजात चांगले काम करत असलेल्या आपच्या पदाधिकार्‍यावर जीव घेणे हल्ले होत आहेत.

मुंबई :आता काळाचौकी पोलिस ठाण्यात पाणी तुंबणार नाही !

शांताराम बोर्‍हाडे म्हणाले, की अशा प्रवृत्तीना वेळीच रोखणे गरजेचे आहे. पोलिसांचा वचक कमी होत असल्याने शहरात अशी गुन्हेगारी वाढत आहे. राजकीय लोक शहरात सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेला सुरक्षेची हमी मिळणे अवघड आहे.

जगनमोहन रेड्डींच्या मंत्रिमंडळाची फेररचना, २५ मंत्री शपथबद्ध, मंत्रिमंडळ विस्तारात साधली जातीय समीकरणे

आंदोलनात चेतन बेंद्रे, सरफराज मुल्ला, वैजनाथ शिरसाठ, तेजस्विनी नसरूला, आम आदमी रिक्षा संघटनेचे सदस्य स्वप्निल जेवळे, इम्रान खान, आशुतोष शेळके, सामाजिक कार्यकर्ते चंद्रमनी जावळे, सतीश यादव, विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, समीर शब्बीर अरावडे, सचिन भोंडे, हनुमंत झाडे, राघवेंद्र राव, ब्राह्मनंद जाधव, अजय सिंग, प्रविण शिंदे, एकनाथ पाठक आदी सहभागी झाले होेते.

Back to top button