नाशिकरोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला : सुनील बागूल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, 2022 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच कामास लागा, असे आवाहन शिवसेना उपनेते सुनील बागूल यांनी केले.
शालिमार कार्यालयात सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड विभागातील पक्षाचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाशिकरोड परिसरातील प्रत्येक प्रभागातील पदाधिकार्यांशी वैयक्तिक चर्चा करून पक्षीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. प्रभागात सदस्य नोंदणी मोहिमेला मिळालेला प्रतिसाद, मतदार याद्यांचा अभ्यास, 2017 च्या निवडणुकीत शिवसेना व प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळालेली मते, पराभव झाल्याची कारणे आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
बैठकांना माजी महापौर नयना घोलप, देवळाली विधानसभाप्रमुख केशव पोरजे, पूर्व विधानसभाप्रमुख नितीन चिडे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, ज्योती देवरे, स्वाती पाटील, प्रज्ञा गायकवाड, योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, उपमहानगरप्रमुख योगेश देशमुख, समन्वयक शिवा तकाटे, मसूद जिलानी आदी उपस्थित होते.