Shiv Subrahmanyam : अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचे निधन, काही दिवसांपूर्वी झाले होते मुलाचे निधन

 Shiv Subrahmanyam
Shiv Subrahmanyam

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्यम ( Shiv Subrahmanyam ) यांचे निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्‍यांच्‍या निधनाने चित्रपट जगतावर शोककळा पसरली असून, अनेक सेलिब्रिटींनी त्‍यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दोन महिन्यांपूर्वी झाला होता मुलाचा मृत्यू

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या बिना सरवर यांनी ट्विटरवर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बीना सरवर यांनी ट्विट केले- 'खूप दुःखद बातमी. मुलगा जहाँच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा जहाँ याला ब्रेन ट्युमर झाला होता. १६ व्या वाढदिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Shiv Subrahmanyam : मीनाक्षी सुंदरेश्वर चित्रपट ठरला शेवटचा

शिवकुमार गेल्या वर्षी 'मीनाक्षी सुंदरेश्वर' चित्रपटात शेवटचे दिसले होते. याशिवाय अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांच्या '2 स्टेट्स' या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या

चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासोबतच शिवकुमार यांनी काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. या चित्रपटांमध्ये विधू विनोद चोप्राचा चित्रपट 'परिंदा' आणि सुधीर मिश्राचा चित्रपट 'हजारों ख्वैशीं ऐसी' यांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news