सोनम कपूर-आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरी दरोडा, १.४१ कोटींचे दागिने चोरीला | पुढारी

सोनम कपूर-आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरी दरोडा, १.४१ कोटींचे दागिने चोरीला

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री सोनम कपूर-आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरी दरोडा पडलाय. त्यांच्या घरातून १.४१ कोटींचे दागिने चोरीला गेले आहेत, असे वृत्त समोर आले आहे. सोनमच्या सासूने तत्काळ तुघलक रोड पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केल्याचे समजते.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, हाय-प्रोफाइल चोरीमुळे, दिल्ली पोलिसांनी तपास पथके तयार केली आहेत. तपासाचा भाग म्हणून सोनम आणि आनंदच्या घरी असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. २५ कर्मचारी, तसेच ९ केअर टेकर, ड्रायव्हर, गार्डनर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची दिल्ली पोलिस चौकशी करत आहेत. सोनम आणि आनंदचे दिल्लीतील निवासस्थान असलेल्या गुन्ह्याचा तपास दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे.

सोनमचे सासरे हरीश आहुजा आणि सासू प्रिया आहुजा दिल्लीत आनंदची आजी सरला आहुजासोबत अमृता शेरगिल मार्गावर राहतात. ११ फेब्रुवारी रोजी सरला आहुजा (आजी) यांनी तिच्या तक्रारीनुसार दागिने आणि रोख रकमेसाठी कपाट तपासले, तेव्हा चोरी झाल्याचे समजले. २३ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी सोनम आणि आनंद यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास सुरू केला. गुन्ह्यात काही संशयित आहेत की नाही हे पाहण्यासाठी ते मागील वर्षाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पाहत आहेत.

सध्या सोनम आणि आनंद मुंबईत आहेत. प्रेग्नेंट असल्याने सध्या ती वडील, अभिनेते अनिल कपूरसोबत राहत आहे.

Back to top button