जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील जामिया मशिदीत आझादी आणि भारतविरोधी घोषणा, सुरक्षा रक्षकांवर दगडफेक (Video)

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील जामिया मशिदीत आझादी आणि भारतविरोधी घोषणा, सुरक्षा रक्षकांवर दगडफेक (Video)

श्रीनगर ; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीर मधील श्रीनगर येथील जामिया मशीद ही मोठ्या मशिदींपैकी एक मानली जाते, दरम्यान शुक्रवारी नमाज पठणानंतर या मशिदीमध्ये आझादी आणि भारतविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. याचबरोबर त्यांच्याकडून झाकीर मुसाचा जयघोष करण्यात आला. अन्सार गजवत-उल-हिंद या दहशतवादी गटाच्या प्रमुखाला मे २०१९ मध्ये भारतीय लष्कराने ठार केले होते.

इंडिया टुडेचे पत्रकार अश्रफ वानी यांनी जामिया मशिदीतील एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये लोक भारतापासून वेगळे होण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देताना दिसतात. वानी यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आझादीच्या जोरदार घोषणा केल्या जात आहेत. "नारा ए तकबीर, अल्लाहू अकबर" अशा घोषणा स्पष्ट ऐकू येत आहेत.

आझादीच्या घोषणा व्यतिरीक्त, मशिदीच्या बाहेर दगडफेकही केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ज्या भागात दगडफेक झाली त्या भागात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना शांतता भंग होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणेसाठी तैनात करण्यात आले होते.

या सर्व घटनेनंतर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर काल (दि.०८) शुक्रवारी दगडफेक करण्यात आली. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच असा प्रकार समोर आल्याचे माहिती समोर येत आहे. ३७० कलम रद्द केल्याने राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्याने भारतामध्ये काश्मीर आणि जम्मूचे अधिक महत्व वाढले. दरम्यान, दगडफेक सुरू झाल्यानंतर काही वेळातच कायद्याचे विशेष अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि जमावाला पांगवले.

जम्मू-काश्मीर : ५ ऑगस्ट २०१९ नंतरची पहिलीच घटना

मागच्या महिन्यात सीआरपीएफचे डीजी कुलदीप सिंग म्हणाले होते की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर दगडफेकीच्या घटनांचे प्रकार जवळजवळ शुन्यावर आले आहेत. १६ मार्च २०२२ रोजी सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनाच्या समारंभादरम्यान परेडच्या वेळी कुलदीप सिंग यांनी हे वक्तव्य केले होते.

५ ऑगस्ट २०१९ रोजी, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० नुसार दिलेला स्वतंत्र दर्जा किंवा स्वायत्तता अवैध ठरवली. कलम ३७० रद्द करण्याबरोबरच, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन करून दोन नवीन केंद्रशासित प्रदेश देखील तयार केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news