कोल्हापूर गर्भपात प्रकरण : गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरला पकडण्यासाठी महिला कॉन्स्टेबलने बजावली महत्वपूर्ण कामगिरी | पुढारी

कोल्हापूर गर्भपात प्रकरण : गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरला पकडण्यासाठी महिला कॉन्स्टेबलने बजावली महत्वपूर्ण कामगिरी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल रूपाली यादव यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. रूपाली यादव बनावट ग्राहक म्हणून रिक्षातून अन्य सहकाऱ्यांसमवेत बुधवारी रात्री पडळ येथे गेल्या होत्या. बनावट डॉक्टर हर्षल नाईक याने रूपाली यादव यांच्याकडून पाच हजार रुपये घेऊन गर्भपाताच्या तीन गोळ्या आणि पूड दिली होती. (गर्भपात प्रकरण)

पथकातील अन्य सदस्यांच्या समवेत बोगस डॉक्टर हर्षद नाईक रिक्षातून कोल्हापूरला आला होता. गर्भपात करण्यासाठी बोगस डॉक्टरांनी २५ हजार रुपयांचा दर निश्चित केला होता.

वैद्यकिय परवाना अथवा शैक्षणिक अर्हता नसतानाही बेकायदेशीररीत्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री पर्दाफाश केला कोल्हापूर येथील हरिओमनगर अंबाई टँक रंकाळा परिसर तसेच पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील रुग्णालयावर छापा टाकून दोन बोगस डॉक्टरसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक संशयित पसार झाला आहे.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून विशेष पथकाने संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल केला. (गर्भपात प्रकरण)

अटक केलेल्या दोन बोगस डॉक्टरांसह तिघांची कसून चौकशी सुरू झाले आहे. या रॅकेटचा शहरासह जिल्ह्यात किती काळापासून हा प्रकार सुरू आहे. आजवर गर्भपाताचे किती प्रकार घडले आहेत याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Back to top button