पुणे : लोणी देवकर येथील दरोडा; चार तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या | पुढारी

पुणे : लोणी देवकर येथील दरोडा; चार तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे सोमवारी पडलेल्या दरोड्यानंतर इंदापूर पोलिसांनी अवघ्या चार तासात या प्रकरणाचा छडा लावत दोघा दरोडेखोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दरोड्यात वापरलेले वाहन व मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी फरार आहेत.

Pakistan Political Crisis : पाकिस्तानमधील राजकीय संकट टोकाला; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला राजीनामा

येथील डोंगरे वस्ती येथे सोमवारी (दि. ४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चार अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत १ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी आनंद सहदेव डोंगरे (वय ३५, रा. डोंगरेवस्ती लोणी देवकर, ता. इंदापुर) यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात उष्माघाताचे दोन, तर जळगावात एकाचा बळी

अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराकडून इंदापूर पोलीसांनी तीन मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली स्काॅर्पिओ व हत्यारे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी एक अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

संजय राऊत : तर कोल्हापूरकरांवर भाजी, मटण किती घेतलं यावर भाजपची नजर असेल

चार अज्ञात आरोपींने फिर्यादी डोंगरे यांचे राहते घरी जाऊन चाकूचा धाक दाखवत फिर्यादीसह त्यांच्या आईला हाताने मारहाण केली. शिवीगाळ करुन तसेच आरडाओरडा केल्यास तुमचा जीव घेइन, अशी धमकी देत रोख रक्कम, सोन्याचे दागीने व मोबाइल असा एकूण १ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश माने यांकडे सोपवण्यात आला होता.

Back to top button