पिंपरी : पत्नीला बेदम मारहाणप्रकरणी पतीवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : पत्नीला बेदम मारहाणप्रकरणी पतीवर गुन्हा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलीस कर्मचार्‍याने मैत्रिणीसोबत जाऊन पत्नीला पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 28) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर, मोशी येथे घडली.

याप्रकरणी नितीन कैलास औटी (वय 35) आणि त्याची 34 वर्षीय मैत्रीण याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

‘भाजप महाराष्ट्रात अतिरेक्यांप्रमाणे कारवाई करत आहे; जशासं तसं उत्तर द्यावं लागेल’

याप्रकरणी रूपाली नितीन औटी (वय 32) यांनी सोमवारी (दि. 28) याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपी पती नितीन औटी हा पहाटे साडेतीनच्या सुमारास दारू पिऊन घरी आला.

पत्नीने दरवाजा न उघडल्याने त्याने दरवाजावर लाथा मारल्या. त्यानंतर तो रूपाली यांना शोधण्यासाठी खाली गेला. रूपाली घरातच असल्याचे समजल्याने तो पुन्हा घरी आला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची आरोपी मैत्रीण होती.

टोयोटाची हायलक्स अ‍ॅडव्हेंचर कार लवकरच बाजारात

तू घरातून कुठे गेली होतीस, अशी विचारणा करीत रूपाली यांच्या नाकावर, तोंडावर, पोटात, कमरेवर लाथा-बु्क्यांनी मारहाण केली. तसेच, पतीच्या महिला आरोपी मैत्रीणीनेही शिवीगाळ करीत तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पुजारी तपास करीत आहेत.

Back to top button