यवतमाळ : मुलीला फरफटत नेत शेतात अत्याचार; एकाने ठेवली पाळत | पुढारी

यवतमाळ : मुलीला फरफटत नेत शेतात अत्याचार; एकाने ठेवली पाळत

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन एका १७ वर्षीय मुलगी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावाबाहेर शौचास जात असताना दोन तरुणांनी मोटारसायकलवर येत मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर जवळच्या शेतात नेऊन त्यापैकी एकाने तिच्यावर अत्याचार केला. तर दुसऱ्याने ये-जा करणाऱ्यांवर पाळत ठेवली. सोमवारी तालुक्यातील कुंभा शेतशिवारात घडलेल्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे. दरम्यान, मारेगाव पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत दोघाही आरोपींना राळेगाव येथून अटक केली आहे.

शहबाज शेख शब्बीर (वय २७, रा. मातानगर, राळेगाव) व हर्षल लाला मडावी (वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर पीडितेने आपल्या पालकांसह मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, १७ वर्षीय मुलगी सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शौचास जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. गावालगतच्या शिवाराकडे ती मोबाइलवर बोलत निघाली. याचवेळी अचानक मागून दोन युवक आले. काही कळायच्या आत त्या दोघांनी जबरीने तिला मोटारसायकलवर बसवून शेतशिवारात नेले. तेथे दुचाकीवरून उतरवून नंतर तिला फरफटतच राजू केळकर यांच्या शेतातील झुडपात नेले. यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरड केला. मात्र, आजूबाजूला कुणीही नसल्याने तिला मदत मिळाली नाही.

दोघांपैकी एकाने तिला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याचा सहकारी घटनास्थळाकडे कुणी येत नाही ना, यासाठी पाळत ठेवून होता. दरम्यान, अत्याचारानंतर त्या दोनही आरोपींनी दुचाकीद्वारे तेथून पळ काढला. त्यानंतर पीडितेने तिच्यावर घडलेला प्रसंग आईपुढे कथन केला. आईने लगेच तिला सोबत घेऊन मारेगाव पोलीस ठाणे गाठले. या घटनेची तक्रार प्राप्त होताच, सहायक पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या. यवतमाळच्या सायबर सेलची मदत घेत संबंधित मोबाइल क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर ते लोकेशन राळेगाव पोलिसांना देण्यात आले. मारेगावचे सहायक पोलीस निरीक्षक मुडे यांच्या मदतीने अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या अवघ्या काही तासात आवळण्यात आल्या.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button