सांगली : हरिपूरमध्ये तरुणाचा खून करून हल्लेखोर पसार | पुढारी

सांगली : हरिपूरमध्ये तरुणाचा खून करून हल्लेखोर पसार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : हरिपूर येथील तरुणावर काही अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करुन हल्लेखोर पसार झाले. सोमवारी रात्री हरिपूर येथे घडलेल्या घटनेतील सुरेश नांद्रेकर (वय 47, रा. हरिपूर, जि. सांगली) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना सोमवारी रात्री उशिरा मिरज तालुक्यातील हरिपूर रोडवरील गजानन कॅालनीजवळ नांद्रेकर यांच्या शेताजवळ घडली. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पतीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी नांद्रेकर यांची पत्नी सुद्धा गंभीर जखमी झाली.

संबंधित घटनेचा पोलिसांनी केलेल्या तपासात अज्ञात तीन हल्लेखोरांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहीती समोर आली. पोलीसांकडून हल्लेखोरांची नावेही निष्पन्न केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप हा खून कोणी व कशासाठी केला हे पोलीसांनी जाहीर केलेले नाही.

हेही वाचा

Back to top button