मुंबईतील हिरानंदानी समूहावर आयकर विभागाची छापेमारी | पुढारी

मुंबईतील हिरानंदानी समूहावर आयकर विभागाची छापेमारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज हिरानंदानी समूहावर आज (मंगळवार) आयकर विभागाने छापेमारी केली. केंद्रीय एजन्सीने मुंबई, चेन्नई आणि बंगळूरमध्ये सुमारे २४ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. कंपनी परिसर आणि कार्यालये तसेच काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचीही झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम व्‍यवसायिकांमध्‍ये मोठी खळबळ उडाली आहे. चेन्नईतील नवी टाऊनशीप आणि बेंगळुरूमधील नवीन डेटा सेंटर उभारणीत करचोरी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

 

 

Back to top button