‘एमआयएम’ला सोबत घेण्‍याचा विचार नाही : शरद पवार | पुढारी

'एमआयएम'ला सोबत घेण्‍याचा विचार नाही : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘एमआयएम’ला कोणत्या पक्षासोबत जायचं आहे हे याच पक्षाचे नेतेच सांगू शकतात; पण त्यांना ज्या पक्षासोबत  जायचं आहे त्‍या पक्षाने तरी प्रथम हाेकार दिला  पाहिजे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ‘एमआयएम’ला साेबत घेणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्‍पष्‍ट केले.

‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलिल यांनी महाविकास आघाडीत सहभागी हाेण्‍याचा प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रस्ताव नाकारला होता. औरंगजेबाचा कबरीसमोर झुकणाऱ्यांसमोर शिवसेना युती करणार नाही, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा प्रस्ताव स्पष्ट शब्दात नाकारला होता. यानंतर आज शरद पवार यांनी युतीबाबतच्या सर्व शक्यता नाकारल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या युतीबाबतच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आज शिवसेना खासदारांना संबोधित करताना त्यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा, असा  आदेश त्यांनी खासदारांना दिला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button