popular leader : पंतप्रधान मोदी ठरले सर्वाधिक लोकप्रिय नेते, जगातील १३ लोकप्रिय नेत्‍यांमध्‍ये ठरले अव्‍वल | पुढारी

popular leader : पंतप्रधान मोदी ठरले सर्वाधिक लोकप्रिय नेते, जगातील १३ लोकप्रिय नेत्‍यांमध्‍ये ठरले अव्‍वल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वात लोकप्रिय नेत्‍यांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्‍हा एकदा अव्‍वल ठरले आहेत. ( popular leader ) ‘मॉर्निंग कन्‍सल्‍ट पॉलिटिकल इंटेलिजन्स युएस’ने जारी केलेल्‍या ग्‍लोबल लीडर अप्रूवलनुसार मोदी हे ७७ टक्‍क्‍यांच्‍या गुणांह जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश आत्‍मनिर्भर भारत निर्मितीसाठी अग्रेसर आहे, असे भाजपनं म्‍हटलं आहे.

popular leader : दुसर्‍या क्रमांकावर मेक्‍सिकोचे ओब्रेडोर

अमेरिकेतील ग्‍लोबल लीडर अप्रूवल ट्रॅकर मॉर्निंग कन्‍सल्‍टने जगातील लोकप्रिय नेत्‍यांना मिळालेले रेटिंग जारी केले आहे. जगातील लोकप्रिय १३ नेत्‍यांपैकी मोदींना ७७ रेटिंग मिळाले असून ते अग्रस्‍थानी आहेत. मोदी यांच्‍यानंतर मेक्‍सिकोचे एंड्रेस मॅन्‍युल लोपेज ओब्रेडोर हे व्‍दितीय तर इटलीचे मारिया द्राघी हे तिसर्‍या स्‍थानी आहे. या दोघांचे रेटिंग अनुक्रमे ६३ व ५४ इतके आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना ४५ रेटिंग मिळघले आहे. तर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन आणि ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान स्‍कॉट मोरीसन यांना ४१ रेटिंग मिळाले आहे. ९ ते १५ मार्च या काळातील माहितीच्‍या आधारे हे रेटिंग असल्‍याचे ‘मॉर्निंग कन्‍सल्‍ट युएस’ने स्‍पष्‍ट केले आहे.

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍या बायडेन यांचे अप्रूवल रेटिंग हे राष्‍ट्राध्‍यक्ष झाल्‍यानंतर कमी झाले आहे. मागील वर्षी कोरोनाबाधितांचे वाढते मृत्‍यू, अफगाणिस्‍तानमधून अमेरिकेचे सैन्‍य माघारीचा निर्णय व अन्‍य समस्‍यांमुळे बायडेन यांची लोकप्रियता घसरली असल्‍याचे निरीक्षही नोंदवण्‍यात आले आहे. तसेच नापसंतचे रेटिंगही सर्वात कमी मोदी यांना मिळाले असून ते १७ टक्‍के इतके आहे.

हेही वाचलं का?

 

 

 

Back to top button