केरळमध्ये फुटबॉल मॅचवेळी प्रेक्षक गॅलरी काेसळली; २०० जखमी, ५ गंभीर | पुढारी

केरळमध्ये फुटबॉल मॅचवेळी प्रेक्षक गॅलरी काेसळली; २०० जखमी, ५ गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमध्ये फुटबॉल मॅच दरम्यान मोठी दुर्घटना घडली . मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूर येथे फुटबॉल स्टेडीयमची प्रेक्षक गॅलरी कोसळून २०० लोक जखमी झाले. यातील ५ जण गंभीर आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेवेळी  गॅलरीत २ हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते.

हाकलिकावूच्या पूंगोड स्थित असलेल्या एका शाळेच्या मैदानावर स्थानिक संघांमध्ये फुटबॉलच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सामना पाहण्यासाठी गॅलरीत मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. संपूर्ण प्रेक्षक गॅलरी भरल्यानंतरही आयोजकांकडून येणाऱ्या लोकांना थांबवण्यात आले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button