राज्यात 7 लाख लोक अद्यापही तिसर्‍या डोसच्या प्रतीक्षेत | पुढारी

राज्यात 7 लाख लोक अद्यापही तिसर्‍या डोसच्या प्रतीक्षेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात आतापर्यंत 16 लाख 48 हजार 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना दक्षता (तिसरा / बूस्टर) डोस देण्यात आला आहे. तर सध्या मार्चअखेर 60 वर्षांवरील आणखी 7 लाख लाभार्थी तिसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
तसेच खासगी रुग्णालयांकडे लसींचे डोस वापराअभावी पडून असून आतापर्यंत लाखो डोसची मुदतही संपली आहे. म्हणून तिसरा डोस सर्वच वयोगटासाठी खुला करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लखीमपूर खिरी प्रकरण : आशिष मिश्राचा जामीन का रद्द केला जाऊ नये : सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

देशभरात 16 मार्च हा लसीकरण दिन म्हणून राबवण्यात येतो. या दिनानिमित्त लसीकरणाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले जाते. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना डोस दिलेल्यांची संख्या 2 कोटी 52 लाख आहे. ज्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आणि ज्यांना काही सहव्याधी आहेत त्यांना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येत आहे.

दिशा सॅलियान प्रकरण : नारायण राणे, नितेश राणे यांना जामीन मंजूर

आतापर्यंत राज्यात 15 वर्षे व त्यापुढील मिळून 15 कोटी 79 लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 8 कोटी 75 लाख जणांना पहिला तर 6 कोटी 87 लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तरीही राज्यात कोविशिल्ड लसींची संख्या पडून आहे. एकट्या पुणे शहरात आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लसींचा डोस नष्ट करावा लागला आहे. राज्यात ही संख्या लाखांच्या घरात आहे.

रश्मी शुक्‍ला यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यास सुरुवात

लस शिल्लक राहिली असली तरी इतर वयोगटासाठी खुली करावी, याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात येतो. त्यामुळे केंद्रीय आरोग्य खात्याकडून निर्णय आल्याखेरीज ती इतरांना देऊ शकत नाही.
                                                      – डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण विभाग

प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री?; पंतप्रधानांनी ट्विट केला फोटो

Back to top button