बारामतीला मिळणार बिबट सफारीचा मान; 100 हेक्टरवर प्रकल्प | पुढारी

बारामतीला मिळणार बिबट सफारीचा मान; 100 हेक्टरवर प्रकल्प

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील वन विभागाचे निसर्ग पर्यटन तसेच वन्यजीव संवधर्नामध्ये अग्रेसर राहण्याच्या द़ृष्टीने वन विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक उपक्रम म्हणजे बिबट सफारीचा असून, त्याला अर्थसंकल्पामध्ये 60 कोटी रुपयांचा निधीही देण्याबाबतचे सूतोवाच झाले आहे.

GDP Affects : युक्रेन युद्धाचा जीडीपीवर होणार परिणाम, रुपयाची घसरण होण्याची शक्यता

पुणे वन विभागांतर्गत बारामती वनपरिक्षेत्रामध्ये गाडीखेल येथील तब्बल 100 हेक्टरवर पहिल्या टप्प्यात बिबट सफारी हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसर्‍या टप्प्यामध्ये टायगर सफारी, तर तिसर्‍या टप्प्यामध्ये आफ्रिकन सफारीचे नियोजन केले जाणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.

Kapil Sibbal : गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं : कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

मानव व बिबट संघर्ष कमी करण्याच्या उद्दिष्टाने दौंड, इंदापूर, बारामतीमधील कन्हेरी वन उद्यान, मयूरेश्वर अभयारण्य, कडबनवाडी लोक अभय वन, भादलवाडी, भिगवण पक्षी निरीक्षक केंद्र, गुप्तेश्वर वन उद्यान, डाळींब वन उद्यान अशा निसर्ग पर्यटन परिसराचाही त्यामुळे विकास होणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Nawab Malik’s plea : नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

केंद्रीय वन विभागाला प्रस्ताव

गाडीखेल येथे होणार्‍या 100 हेक्टरवरील बिबट सफारीबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय वन विभागाकडून दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. त्यासाठी आराखडा पुढील आठवड्यात केंद्राला पाठविण्यात येणार असून, कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.

बिबट सफारी प्रकल्पाबाबत सध्या बारामती की जुन्नर असा वाद सुरू आहे. वास्तविक जुन्नरचा प्रस्ताव वेगळा असून तेथे या पूर्वीच बिबट्या निवारण केंद्र अस्तित्वात आहे. हा प्रकल्प बारामतीचाच असून त्याच्या आराखड्याचे काम सुरू आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू केला जाईल.

– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल ; भाजपच्या गोंधळाने विधानपरिषदेत दिवसभरासाठी कामकाज तहकूब

माजी आमदार शरद सोनवणेंचा उपोषण करण्याचा इशारा

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील भौगोलिक स्थिती बिबट सफारीसाठी पूरक आहे. गेल्या सहा वर्षांपासून शासनदरबारी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे बिबट सफारी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही बेमुदत उपोषण करू, असा इशारा माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिला. जुन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, या सफारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. सर्वाधिक बिबट आढळणार्‍या जुन्नर तालुक्यातील प्रकल्प जेथे बिबट्याचा कवडीमात्र संबंध नाही अशा बारामतीला नेण्याची कल्पनाच हास्यास्पद आहे. जुन्नरमधील वातावरण, भौगोलिक रचना, रेस्क्यू सेंटर, बिबट्यांचे अद्ययावत रुग्णालय आदी सर्वच बाबी सफारीसाठी पूरक आहेत. सफारीमुळे तालुक्यातील पर्यटन व्यवसाय वाढून ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती मिळेल. या प्रसंगी संतोष घोटणे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, विकास राऊत, माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे आदी उपस्थित होते.

Back to top button