Kapil Sibbal : गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं : कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

Kapil Sibbal
Kapil Sibbal

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील  पराभवाची कारणे माहीत नसतील तर कल्पनेत जगणे सोडावं, अशा शब्‍दात काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्व‍ावर हल्लाबोल केला.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) रविवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आपली बाजू भूमिका स्‍पष्‍ट केली. काहींनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला तर काहींनी याला विरोधही केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट पक्षनेतृत्वावर निशाणा साधला.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मला काही आश्चर्य वाटलेले नाही; पण पक्षाने विचार करावा की, काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बाहेरही काँग्रेस आहे. त्यांनी इतर नेत्यांचं म्हणणंही ऐकून घेण्याची गरज आहे. पक्षाचं नेतृत्व हे फार संकुचित विचार करत आहे, त्यांना मागील आठ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होतेय, याची कारणं ठाऊकच नाहीत". तसेच "घर की काँग्रेस, असे न म्हणता, काँग्रेसच घर म्हणण्याची वेळ आता आली आहे,"

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news