Nawab Malik’s plea : नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार | पुढारी

Nawab Malik’s plea : नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई, पुढारी ऑनलाईन : दाऊद इब्राहिम मनीलॉन्‍ड्रिंग प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाच्‍या (ईडी) कोठडीत असलेले अल्‍पसंख्‍याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्‍या याचिकेवर (Nawab Malik’s plea) आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे. तरीही मलिकांना जामीनासाठी रितसर अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असं हायकोर्टाने म्हंटलेलं आहे. त्याचबरोबर ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

आपल्‍याला झालेली अटक ही बेकायदा असून, तत्‍काळ सुटका करण्‍यात यावी, अशी मागणी त्‍यांनी या याचिकेतून केला होता. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने यासंदर्भातील निकाल राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी झाली.

मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने आठ तास चौकशी केली. यानंतर त्‍यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्‍यात आली होती. यानंतर त्‍यांना १५ मार्चपर्यंत न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली होती. मलिक यांच्‍या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, यावर मंगळवारी निकालपर्यंत निकाल राखून ठेवण्‍यात आला होता.

 

Back to top button