priya bapat : माणसं जपणारी, कधीही न चिडणारी माझी आई, तुला काय शुभेच्छा देणार | पुढारी

priya bapat : माणसं जपणारी, कधीही न चिडणारी माझी आई, तुला काय शुभेच्छा देणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट आणि वेब सीरीज अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाचे कौशल्या दाखवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. (priya bapat) मराठमोळ्या प्रिया बापट हिची एक भावूक पोस्ट चर्चेत आलीय. आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिने ही खास पोस्ट आपल्या आईसाठी लिहिलीय. तिने या पोस्टमधून आपल्या आईचं इतकं कौतुक केलंय की, ती ही पोस्ट वाचून तुम्हालाही अप्रुप वाटू लागेल. (priya bapat)

उद्या ८ मार्च महिला दिन आणि आज ७ तारखेला प्रियाच्या आईचा वाढदिवस आहे. तिने सकाळी सकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्या आईला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय-माझी आई ❤️ सर्वात प्रेमळ, लाघवी, सहनशील, मनमोकळी, शांत, अंतर्मुख, माणसं जपणारी, कधीही न चिडणारी माझी आई. आज तुझा वाढदिवस. मी तुला काय शुभेच्छा देणार… तू समाधानी आहेस मला माहीत आहे. अशीच आनंदी राहा. तुझे आशिर्वाद आहेतच कायम❤️😘 🔥😍🔥❤️

तिने या पोस्टसोबत आपल्या बालपणीचा फोटोदेखील शेअर केलाय. या फोटोमध्ये ती आपल्या आईसोबत दिसतेय. दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने आपल्या आईचा सिंगल फोटो शेअर केलाय. तिच्या चाहत्यांनी तिच्या आईला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, प्रिया बापटने एक फोटोशूट केला होता. या फोटोसऊटमध्ये ती मीडियम सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये दिसत होती. या नव्या लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत होती. या ड्रेसमध्ये तिचं रुप आणखी खुलून दिसत होती.

उमेश कामतसोबत जबरदस्त केमिस्ट्री

प्रिया आणि उमेश कामतची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. मराठी क्यूट कपलपैकी एक हे कपल आहे. त्याने सहा वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी ऑक्टोबर २०११ रोजी लग्न केलं होतं.

प्रिया आम्ही दोघी, टाईमपास २, काकस्पर्श आणि इतर अनेक चित्रपटांसाठी ओळखली जाते. ती अभिनयाव्यतिरिक्त ती तिच्या हॉट लुक आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. प्रिया तिची प्रत्येक स्टाइल आणि ड्रेस अतिशय आकर्षक बनवते. रॉकिंग कॅज्युअल लुक्सपासून ते साडी किंवा वनपीस लूकपर्यंतची प्रियाची स्टाईल नेहमीच चर्चेत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

Back to top button