सिडनी : ऑस्ट्रेलियात रहस्यमय प्राणी | पुढारी

सिडनी : ऑस्ट्रेलियात रहस्यमय प्राणी

सिडनी :  पृथ्वीवरील अनेक प्रजाती अद्यापही विज्ञानाला अज्ञातच आहेत. याबाबत सतत नवे नवे संशोधन होत असते आणि पशुपक्षी, वनस्पती तसेच सूक्ष्म जीवांच्याही अनेक नव्या प्रजाती समोर येत असतात. काही जीव तर अगदी परग्रहावरीलच असावेत असे असतात. आता ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये अशाच एका ‘एलियन’ जीवाला पाहण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या  सिडनीमधील एका व्यक्तीला मॉर्निंग वॉकवेळी रस्त्याकडेला हा प्राणी दिसून आला. असा विचित्र प्राणी यापूर्वी पाहण्यात नसल्याने त्याला आश्चर्य वाटले. हा एखादा प्रौढ जलचर प्राणी आहे की एखाद्या जलचराचे भ—ूण आहे हे कळण्यास मार्ग नाही. हॅरी हायस नावाच्या या माणसाने त्याचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. तो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आला.

हा प्राणी मृतावस्थेत असावा कारण त्याला काठीने स्पर्श केल्यावरही त्याच्यामध्ये कोणती हालचाल दिसून आली नाही. या विचित्र जीवाला पाहून सोशल मीडियात नेहमीप्रमाणेच अनेकांनी त्याला ‘एलियन’ जीव ठरवले! अर्थात काहींनी हे माशाचे भ—ूण असू शकते असेही म्हटले. आता सिडनी युनिव्हर्सिटी आणि न्यू साऊथवेल्स युनिव्हर्सिटीचे संशोधक याबाबत संशोधन करीत आहेत.

 

Back to top button