वास्को : उपराष्ट्रपती नायडू गोव्यात दाखल | पुढारी

वास्को : उपराष्ट्रपती नायडू गोव्यात दाखल

वास्को : पुढारी वृत्तसेवा
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दाबोळी विमानतळावरील हंस तळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर, राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलिस महासंचालक इंद्रदेव शुल्का उपस्थित होते.

उपराष्ट्रपती दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आले असून रात्री त्यांचा मुक्काम राजभवनवर होता. राज्यभवनावर राज्यपाल पिल्लई आणि त्यांच्या पत्नी अ‍ॅड. के. रिटा यांनी त्यांचे स्वागत केले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते होणार आहे. या हॉलमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होणार असून उद्घाटनाला मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच राज्यपालांसह इतर मान्यवर उपस्थित असतील.

पाहा व्हिडिओ :  उधवस्त झालेलं तळीये गाव आता कुठल्या अवस्थेत आहे? | Story of Taliye

हेही वाचलत का ?

Back to top button