चिंता वाढली : १८ हजार भारतीय यूक्रेनमध्ये अडकले | पुढारी

चिंता वाढली : १८ हजार भारतीय यूक्रेनमध्ये अडकले

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये (Ukraine) लष्करी कारवाई करण्याची घोषणा आज (गुरूवार) केली. त्यानंतर युद्ध सुरू झाले आहे. रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रे हल्ले केल्याचे वृत्त आहे. युक्रेनमध्ये धुराचे लोट पाहून ज्यांची मुले -मुली यूक्रेनमध्ये अडकली आहेत. त्या भारतीय कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही १८ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

Ukraine-Russia war : “व्लादिमीर पुतीन यांना थांबवा”, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची जगाला विनंती

दरम्यान, ७२ तासांपूर्वी युक्रेनमधून (Ukraine) भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले होते. परंतु हल्ले सुरू झाल्यानंतर ते थांबविण्यात आले आहे. युक्रेनमध्ये गेलेले एअर इंडियाचे विमान भारतात परत आल्याचे वृत्त सकाळी आले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय भारतात कसे येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज १८२ भारतीय मायदेशात परतल्याचे सांगितले जात आहे. कीव शहरातून युक्रेन (Ukraine) इंटरनॅशनल एअर लाईन्सचे एक विमान सकाळी ७.४५ वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले. या विमानातून १८२ भारतीय नागरिक मायदेशात परत आले. यामध्ये विद्यार्थ्य़ांची सर्वाधिक संख्या आहे.

Russia-Ukraine war Live Updates : रशियाची ५ विमाने आणि हेलिकॉप्टर पाडली, युक्रेनचा दावा

या आधी मंगळवारी एअर इंडियाच्या विमानाने नवी दिल्लीतून कीव शहराकडे उड्डान केले होते. त्यावेळी धोकादायक वातावरणात २५० भारतीयांना मायदेशात आणण्यात आले. तर भारतीयांना आणण्यासाठी आज (गुरुवार) आणि शनिवारी आणखी दोन विमाने उड्डाण करणार होती. परंतु, आज हल्ले करण्यास सुरुवात झाल्याने विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली आहे.

हेही वाचलतं का ?

उत्पादनच नाही, तर ‘शुल्क दिवस’ कसला?

सोलापूर : हातोड्याने फोडले दारूचे दुकान नारीशक्‍तीचा दणका ;अवैध व्यावसायिकांमध्ये धास्ती

सातारा : मार्च अखेर वाढीव पेन्शन द्या, कमांडर अशोक राऊत यांची मागणी

Back to top button