Biometric Attendance : केंद्रीय कर्मचार्‍यांच्या बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात, वर्क फ्रॉम होमची सुविधाही बंद | पुढारी

Biometric Attendance : केंद्रीय कर्मचार्‍यांच्या बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात, वर्क फ्रॉम होमची सुविधाही बंद

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचे संकट कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर कार्मिक मंत्रालयाने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या बायोमेट्रिक हजेरीला (Biometric Attendance ) सुरुवात केली आहे. विविध मंत्रालये आणि खात्यात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना देण्यात आलेली वर्क फ्रॉम होमची सुविधाही सरकारने बंद केली आहे.

Biometric Attendance : बायोमेट्रिक हजेरी होती ऐच्छिक

मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट वाढले होते, त्यावेळी सरकारने बायोमेट्रिक हजेरी ऐच्छिक केली होती तसेच कार्यालयांतील कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत खाली आणली होती. दरम्यान दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमधील महाविद्यालये गुुरुवारपासून उघडली गेली आहेत. कोरोना संकट सुरु झाल्यानंतर म्हणजे मार्च 2020 मध्ये ही महाविद्यालये बंद झाली होती. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

हेही वाचलं का ?

Back to top button