जळगाव : एक लाखाची रोकड व सीसीटीव्ही कॅमेरे लांबविणारा भामटा जाळ्यात | पुढारी

जळगाव : एक लाखाची रोकड व सीसीटीव्ही कॅमेरे लांबविणारा भामटा जाळ्यात

जळगाव पुढारी वृत्तसेवा : शहरातील फुले मार्केटमधील सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातून 1 लाख रुपयांची रोकड व सीसीटीव्ही चोरून नेणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव येथील फुले मार्केटमध्ये विकास मकडिया यांचे ‘दृष्टी जनरल सौंदर्यप्रसाधने’ नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेल्या ड्राव्हरमधून १ लाख २ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला होता. याप्रकणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलीस कर्मचारी उमेश भांडारकर यांना शुभम उर्फ बंटी मोहनलाल पुरोहित रा. मारवाडी गल्ली, शिवाजी नगर असे संशयिताचे नाव आहे,  हा ममुराबाद रस्त्यावर फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली, त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे आणि योगेश इंधाटे यांनी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ममुराबाद येथून संशयितास अटक केली.

त्याच्याकडून चोरीचे १४ हजार रूपये प्राप्त झाले. पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button