साक्री नगरपंचायत : मोहिनी जाधव खून प्रकरणातील गुन्हा मागे घ्या ; महिला आयोगाच्या अध्यक्षांना साक्रीतील महिलांचे निवेदन | पुढारी

साक्री नगरपंचायत : मोहिनी जाधव खून प्रकरणातील गुन्हा मागे घ्या ; महिला आयोगाच्या अध्यक्षांना साक्रीतील महिलांचे निवेदन

पिंपळनेर पुढारी : वृत्तसेवा : साक्री नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या वादात मोहिनी जाधव या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता राजकीय द्वेषापोटी सात जणांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरुद्ध ३०२ कलम लावले आहे. यामुळे या सातही जणांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. त्यांच्याविरुद्ध दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी येथील महिलांतर्फे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे करण्यात आली.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर साक्री येथे आल्या असता महिलांनी त्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. गजेंद्र भोसले, उत्पल नांद्रे, मनीष गिते, रमेश सरक, संघपाल मोरे, आधार बोरसे, नितीन देवरे या सातही जणांना या प्रकरणात न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

निवेदन देतांना पौर्णिमा मोरे, रीना बोरसे, शर्मिला भोसले, मन्त्रादेवी नांद्रे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविता पगारे, माजी नगरसेविका अॅड. पुनम काकुस्ते, सरपंच अलका बिरारी, जिल्हा परिषद सदस्या मनीषा देसले, रोहिणी अकलाडे, पंचायत समिती सदस्या हिराबाई माळ, माधुरी सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्या सोनल देवरे, सरपंच चित्रा नांद्रे, लता घुगे, अंजना मराठे, संजीवनी भोसले, संगीता त्रिवेणी, ज्योती गिते, जयश्री अकलाडे, स्नेहल अहिरराव, आराधना शिंदे, भाग्यश्री चौधरी उपस्थित होत्या.

Back to top button