गेल कंपनीच्या संचालकाला लाचखोरीबद्दल अटक | पुढारी

गेल कंपनीच्या संचालकाला लाचखोरीबद्दल अटक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक क्षेत्रातील गॅस ऍथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) कंपनीचे मार्केटिंग विभागाचे संचालक ई. एस. रंगनाथन यांना 50 लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल सीबीआयने अटक केली आहे. खाजगी कंपन्यांना पेट्रोकेमिकल उत्पादने विकताना डिस्काउंट देण्याच्या बदल्यात रंगनाथन यांनी लाच घेतली असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. महाराष्ट्रातील पीएसयू कंपनीकडून या उत्पादनांचे मार्केटिंग केले जाते.

रंगनाथन यांचे निवासस्थान, कार्यालयासहित आठ ठिकाणी छापेमारी करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक मध्यस्थ, व्यापारी आणि अन्य पाचजणांचा समावेश आहे. मुख्य आरोपी रंगनाथन याच्याकडून 1.30 कोटी रुपये, सुमारे सव्वा कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे दिसून आल्यानंतर सापळा रचून रंगनाथन याला अटक करण्यात आल्याचे सीबीआय प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. पवन गौर असे मध्यस्थाचे नाव असून दिल्लीतील रिषभ पॉलीकेमचा संचालक राजेश कुमार यालाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button