Aparna Yadav : मुलायमसिंह यादवांची सून भाजपच्या गळाला लागणार ? | पुढारी

Aparna Yadav : मुलायमसिंह यादवांची सून भाजपच्या गळाला लागणार ?

वाराणसी ; पुढारी ऑनलाईन : अपर्णा यादव यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ११ लाखांची देणगी दिली होती. यावेळी अपर्णा यादव यांनी एक खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की ही देणगी माझ्या स्वेच्छेने देत आहे. माझ्या कुटुंबाचा यामध्ये काहीही संबंध येत नसल्याचेही त्यांनी याबाबत सांगितले होते. भगवान राम भारताचे चारित्र्य संपन्न, संस्कारक्षम आणि करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत असेही त्या म्हणाल्या होत्या. (Aparna Yadav)

Aparna Yadav : अखिलेश यादव यांनी देणगीवरून खडसावले

राम मंदिराच्या उभारणीसाठी मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी दिलेल्या ११ लाख रुपयांच्या देणगीवरून सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, संधी शोधणाऱ्यांना संकटांमध्ये संधी सापडते. आम्ही राम मंदिरासाठी देणगी दिली आहे भाजपसाठी नाही. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

अपर्णा या मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी

मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव आणि अपर्णा यांचे अनेक वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर २०११ मध्ये लग्न झाले. अपर्णा-प्रतिकच्या या लग्नात अनिल अंबानी, अमिताभ बच्चन यांसारखे सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अर्पणा बिश्त यादव यांनी यूकेच्या मँचेस्टर विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारणात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

प्रतीक पत्नी अपर्णा यादवला राजकारणात आणण्याच्या प्रयत्नात

मुलायम सिंह यादव यांचा लहान मुलगा प्रतीक याला राजकारणात यायचे नाही, त्याला पत्नी अपर्णा यादवला राजकारणात आणायचे आहे. प्रतीक त्याची पत्नी अपर्णाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देतो. याचे उदाहरण म्हणजे अपर्णा यादव या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करून प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. अपर्णा बिश्त यादव यांनी २०१७ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लखनऊच्या कॅन्ट मतदारसंघातून विधानसभा लढवली होती.

Back to top button