मोबाईल हरवल्यास Google pay कसं डिलीट करावे ? जाणून घ्या या ६ स्टेप्समधून ! | पुढारी

मोबाईल हरवल्यास Google pay कसं डिलीट करावे ? जाणून घ्या या ६ स्टेप्समधून !

पुढारी ऑनलाईन डेस्क

सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठया गोष्टी स्मार्टफोनवरूनच केल्या जातात. त्यामध्ये सर्वात जास्त बघितलं तर स्वतःच्या बँक अकाऊंटवरून दुसऱ्याच्या बँक अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करणे, ऑनलाईन खरेदी करणे, बिले, कर्जाचे हप्ते भरणे यांचा समावेश आहे. हे सर्व व्यवहार गुगल पे, फोन पे, एनईएफटीच्या माध्यमातून होत असतात.

पेमेंट आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्या वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त पासकोड सुरक्षा पुरवत असतात. याद्वारे ते ॲपसाठी पासकोड सेट करू शकतात. अनेक लोक सुरक्षेसाठी आपल्या फोनमधील स्क्रीन लॉक देखील वापरतात. मात्र अनेक हॅकर्स ते पासवर्ड सहजपणे भेदू शकतात.

बऱ्याचदा तुमचा फोन चोरीला गेला, गहाळ झाला तर फोनमध्ये आपले पेमेंट ट्रान्सफर करण्यात येणारी गुगल पे, फोन पे सारखी ॲप्लिकेशन्स आहे तशीच राहतात. त्याचा दुरूपयोग होवून आपले बँक खाते रिकामे होण्याचाही धोका नाकारता येत नाही.

जर तुमच्यावर असा प्रसंग कधी ओढावलाच तर, फोनमधील गुगल पे ॲप्लिकेशन डिलिट कसे करायचे याची प्रक्रिया आम्ही सांगत आहोत.

अशी करा प्रक्रिया

  • तुमचा अँड्रॉइड फोन हरवला असेल, तर तुम्हाला तुमच्या इतर फोनवरून 18004190157 या नंबरवर कॉल करावा लागेल
    यानंतर तुम्हाला इतर पर्यायांची निवड करावी लागेल
  • यानंतर तुमचा कॉल कस्टमर केअर एजंटशी जोडला जाईल. त्यानंतर ते तुम्हाला Google खाते ब्लॉक करण्यासाठी मदत करतील
  • कस्टमर केअरशी जोडल्यानंतर तुम्हाला तुमचे नोंदणीकृत गुगल खाते आणि मोबाइल नंबरची पडताळणी/खात्री करून द्यावी लागेल
  • या व्यतिरिक्त, तुम्ही पर्यायी पद्धत देखील वापरूनही तुम्ही तुमच्या अँड्रॉइड खात्यातील सर्व डेटा दूरस्थपणे मिटवू शकता. यासाठी तुम्हाला ब्राउझरमध्ये android.com/find ओपन करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटमध्ये साइन इन करावे लागेल.
  • त्यानंतर Google Find My Device मध्ये, तुम्हाला Play Sound, Secure Device आणि Erase Device साठी पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला इरेज डिव्हाईसचा पर्याय निवडावा
  • त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि Erase Device वर क्लिक करा. तुमच्या फोनवरील सर्व डेटा दूरस्थपणे हटवला जाईल.

हेही वाचा

Back to top button