रश्मिका मंदाना ते समंथा ! साऊथच्या अभिनेत्रींचा मानधन आकडा पाहून थक्‍क व्‍हाल! | पुढारी

रश्मिका मंदाना ते समंथा ! साऊथच्या अभिनेत्रींचा मानधन आकडा पाहून थक्‍क व्‍हाल!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

कोणती दाक्षिणात्‍य अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेते. कोणत्‍या अभिनेत्रीची फी किती आहे? हा प्रश्न नेहमीच चित्रपट रसिकांना आणि चाहत्‍यांना पडत असतो. नुकतीच एक बातमी समोर आली की, अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ने अल्‍लू अर्जुन (Allu Arjun) स्‍टारर चित्रपट पुष्‍पा (Pushpa) ब्‍लॉकबस्‍टर हिट होताच आपल्‍या फीमध्ये भरघोस वाढ केली आहे. चला तर मग पाहूयात दाक्षिणात्‍य अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात ते…

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty)

या यादीत बाहुबलीची देवसेना म्हणजेच साऊथ फिल्म स्टार अनुष्का शेट्टी पहिल्या क्रमांकावर आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये घेते.

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal)

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवालदेखील एका चित्रपटासाठी मोठी रक्कम घेते. एका चित्रपटासाठी ती ३ कोटी रुपये मानधन घेते.

पूजा हेगड़े (Pooja Hegde)

‘आला वैकुंठपुरमलो’च्या अभूतपूर्व यशानंतर पूजा हेगडेने तिच्या चित्रपटाची रक्कम वाढवली. ती आता एका चित्रपटासाठी 3.50 कोटी रुपये मानधन घेते.

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)

‘पुष्पा’ या चित्रपटाच्या बंपर यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्नानेही तिची फी वाढवली आहे. ती पुष्पा 2 साठी पूर्ण 3 कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे.

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)

फॅमिली मॅन स्टार समंथा रुथ प्रभूने अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील फक्त एका डान्स नंबरसाठी 1.5 कोटी रुपये घेतले होते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री या चित्रपटासाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त फी घेते.

श्रुती हसन (Shruti Hassan)

कमल हसनची मुलगी आणि दाक्षिणात्य भिनेत्री श्रुती हसन देखील एका चित्रपटासाठी सुमारे अडीच कोटी रुपये मानधन घेते.

नयनतारा (Nayanthara)

तमिळ चित्रपट अभिनेत्री नयनतारा एका चित्रपटासाठी सुमारे २ कोटी रुपये मानधन घेते.

कीर्ती सुरेश

महानती फेम अभिनेत्री कीर्ती सुरेश ही देखील टॉलिवूडची मोठी स्टार आहे. एका चित्रपटासाठी ती सुमारे २ कोटी रुपये मानधन घेते.

साई पल्लवी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथची अभिनेत्री सई पल्लवी एका चित्रपटासाठी सुमारे 2 कोटी रुपये मानधन घेते.

Back to top button