रत्नागिरी : राष्ट्रवादी शहराध्यक्ष चिकणे यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश | पुढारी

रत्नागिरी : राष्ट्रवादी शहराध्यक्ष चिकणे यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

खेड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी आज (शनिवार) दुपारी खेडमधील सभापती निवास येथे शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आ. योगेश कदम व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी शहराध्यक्ष तसेच सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सतीश चिकणे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी थेट शहरातील सभापती निवास येथे शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यासोबत शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली.

यावेळी आ. योगेश कदम, शहर प्रमुख निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, शशिकांत चव्हाण यांच्यासह सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button