चंद्रपूर : जादुटोणा केल्याच्या संशयावरून चौघांना बेदम मारहाण

चंद्रपूर : जादुटोणा केल्याच्या संशयावरून चौघांना बेदम मारहाण
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जादुटोणा केल्याच्या संशयावरून चंद्रपूर शहरातील भिवापूर वॅार्डातील एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अटकेतील सगळ्या आरोपींना शनिवारी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

चंद्रपूर शहरातील भिवापूर वॅार्डात नारायण पदेमवार आणि राम पदेमवार कुटुंबीय राहतात. हे दोघेही भाऊ आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राम पदेमवार यांना मुखाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, आजार कमी होत नसल्याचे पाहून त्यांनी मांत्रिकाचे घर गाठले होते.

कर्करोगाला तुमच्या परिवारातील काहीजण कारणीभूत असल्याचे वारंवार मांत्रिकाने सांगितले होते. तेव्हापासून रामू पदमेवार यांचा नारायण पदेमवार यांच्यावर संशय वाढला होता.

शुक्रवारी (ता.३) सकाळी रामू पदेमवार यांच्या काही नातेवाईकांनी नारायण पदेमवार यांचे घर गाठले. जादुटोणा केल्यामुळे राम पदेमवार यांना कर्करोग झाल्याचे सांगून आशालू पदेमवार, सिनू रादंडी, रवी आशावर, मंगेश पदमेवार यांनी पूजा नारायण पदमेवार, नारायण पदमेवार, भाऊ आणि बहिणीस बेदम मारहाण केली.

या प्रकारानंतर पूजा पदमेवार हिने शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. प्रारंभी पोलिसांनी हे प्रकरण गांर्भीर्याने घेतले नाही. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या कानावर हा प्रकार आला. त्यांनी शहर पोलिस स्टेशन गाठले.

त्यानंतर पोलिसांनी परत पीडित कुटुंबीयांना बोलावून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर आशालू पदेमवार, सिनू रादंडी, रवी आशावर, मंगेश पदमेवार यांच्यासह एकास अटक केली.

हे ही वाचा :

पहा व्हि़डिओ : कोरोना उपचारावरील वाढता खर्च : मेडिक्लेमचे काय आहेत पर्याय? Corona and Mediclaim

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news