अनुष्का शर्मा म्हणते, सेलिब्रिटीच्या मृत्यूचा केला जातो 'तमाशा' | पुढारी

अनुष्का शर्मा म्हणते, सेलिब्रिटीच्या मृत्यूचा केला जातो 'तमाशा'

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ‘बिग बॉस १३’चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला. यानंतर टीव्ही इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडच्या अनेक स्टार्संनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ‘सेलिब्रिटीचे निधन ही बाब फक्त तमाशाच बनविली जाते’ असे म्हणणारी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमी या ना त्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असेत. सध्या अनुष्काने नुकत्याच झालेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर दु: ख व्यक्त केले आहे. याशिवाय तिने सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पसरणाऱ्या वृत्तावर संताप देखील व्यक्त केला आहे.

या दरम्यान अनुष्काने आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर कॉमेडियन झाकीर खान याची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘सेलिब्रिटीचे निधन ही बाब फक्त तमाशाच बनविली जाते’ असे म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या पोस्टमध्ये ‘ते तुम्हाला माणूस मानत नाहीत. त्यामुळे येथे कोणत्याही मर्यादा येत नाहीत. तुमचा मृतदेह हा केवळ त्यांच्यासाठी एक आत्मा नसलेले शरीर असतो. केवळ फोटो काढण्याची एक शेवटची संधी.

कारण यानंतर तुम्ही काय कराल, जास्तीत जास्त १० फोटो, ५ बातम्या, ३ व्हिडिओ, २ कथा, १ पोस्ट आणि ते संपले… यामुळे तुमचा मृत्यू हा एक तमाशा राहील.’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

याआधी अनुष्का शर्माने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर संताप व्यक्त करत दुसऱ्यांचादेखील विचार करा, अशी सूचना चाहत्यांना दिली होती.

हेही वाचलंत का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronny Bhaiya (@zakirkhan_208)

Back to top button