

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईतील नायर रुग्णालयास १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संस्थेस १०० कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना यौद्ध्यांचे कौतुक केले.
देव केवळ मंदिरात, प्रार्थनास्थळांत असे नाही. तो डॉक्टरांच्या रुपात रुग्णालयात आहे. रुग्णालय हे एक मंदिरच आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मानाचा मुजरा केला.
नायर रुग्णालयाची इमारत निर्जीव नाही. त्यात सर्वांनी जीव ओतून ती सजीव केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाचा सुरुवातीचा काळ भीषण होता. विशेषतः सुरुवातीच्या दिवसांत एक दहशत होती. डॉक्टर रुग्णांना तपासायला घाबरत होते. पण आता डॉक्टर अखंडपणे सेवा देत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोरोना यौद्ध्यांचे कौतुक केले.