विदेशी चलन साठा ६३३ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी स्तरावर | पुढारी

विदेशी चलन साठा ६३३ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी स्तरावर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम असून २७ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठा ६३३ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. विदेशी चलनसाठा विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली.

संबंधित आठवड्यात विदेशी चलन साठ्यात तब्बल १६.६६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

स्पेशल ड्रॉईंग राईट्स अर्थात एसडीआरमध्ये गेल्या काही काळात १६.८६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या बुधवारी भारतात १२.५७ अब्ज डॉलर्सची एसडीआर गुंतवणूक केली होती.

२० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठ्याचे प्रमाण ६१६.८९ अब्ज डॉलर्स इतके होते. त्या आठवड्यात फॉरेक्समध्ये २.४७ अब्ज डॉलर्सची घट नोंदविण्यात आली होती. एकूण विदेशी चलन साठ्यातील फॉरेन करन्सी अ‍ॅसेटचे प्रमाण ५७१.६ अब्ज डॉलर्स इतके आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा :मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे

Back to top button