पश्चिम बंगाल मध्ये ‘खेला होबे’; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढणार

पश्चिम बंगाल मध्ये ‘खेला होबे’; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल निवडणुकीत पराभव पत्काराव्या लागणाऱ्या ममता बॅनर्जी आता पोटनिवडणूक लढणार आहेत. २ मे रोजी जाहीर झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी राज्य काबीज केले मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकाला ममता सामोऱ्या जाणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत दोन्हीपैकी एका सभागृहात जाणे बंधनकारक आहे.

त्यामुळे त्यांनी भवानीपूर मतदारसंघाची निवड केली आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला असून ममता तेथून निवडणूक लढविणार आहेत.

३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ही माहिती दिली.

पोटनिवडणुकीबाबत आयोगाने म्हटले आहे , ३० सप्टेंबर रोज मतदान होईल. ३ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

भवानीपूरपाठोपाठ समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवू शकतात.

तसेच निवडणूक आयोगाने कोविड -१९ ची परिस्थिती पाहता इतर ३१ जागांच्या पश्चिम बंगालमधील पोटनिवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

'घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ १५९ -भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले आहेत.

संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचे मत  आजमावले.

तसेच अन्य माहिती लक्षात घेता इतर ३१ विधानसभा मतदारसंघ आणि ३ लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.'

नंदीग्रामची निवड

एप्रिल-मे मध्ये झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने प्रचंड विजय मिळवला होता.

ममता यांचे नीकटवर्तीय असलेल्य सुवेंधू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघाची निवड केल्यानंतर अधिकारी यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविली.

त्यात ममता यांचा पराभव झाला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात २९४ पैकी २१३ जागा जिंकल्या.

ममता दुसऱ्यांदा निवडणुकीला समोऱ्या

पश्चिम बंगाल पोटनिवडणूक हा सध्या चर्चेचा विषय आहे.. २०११ च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी भवानीपूर येथून पोटनिवडणूक लढवली होती.

सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांचा ममता बॅनर्जी यांनी ९५ हजार मतांनी पराभव केला होता.

२०१६ च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून २५ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या.

मात्र, यावेळी त्यांनी नंदीग्राममध्ये जाऊन भाजपला आव्हान दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news