Utpal Parrikar : उत्पल पर्रीकर यांच्‍यासंदर्भातील संजय राऊतांच्या ट्विटची गाेव्‍यात चर्चा | पुढारी

Utpal Parrikar : उत्पल पर्रीकर यांच्‍यासंदर्भातील संजय राऊतांच्या ट्विटची गाेव्‍यात चर्चा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)  यांच्या उमेदवारीवरून सध्या राज्यात चर्चा सुरु आहेत. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्याविरोधात एकही उमेदवार देऊ नका, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांची जाेरदार चर्चा गाेवा राज्‍यात हाेत आहे.

‘केवळ पर्रीकरांचे पुत्र म्हणून उमेदवारी देता येणार नाही’,  असे विधान भाजपचे गाेवा विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्‍हटलं होते. सध्या त्यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार उत्पल यांनी  केले असून पणजी मतदारसंघात प्रचारास सुरुवातही केली आहे.

यावेळी त्यांच्या समर्थनार्थ संजय राऊत यांनी भाजप विरोधातील सर्व पक्षांना उत्पल यांच्याविरोधात उमेदवारी न देण्याचे आवाहन केले आहे. राऊत यांनी उत्पल यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहनही केले होते. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उत्पल यांना आप मध्ये प्रवेश करण्याची ‘ऑफर’ दिली आहे.

हेही वाचा

Back to top button