राजकीय भूकंपातही दादांचे विठ्ठल विठ्ठल | पुढारी

राजकीय भूकंपातही दादांचे विठ्ठल विठ्ठल

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या राजकारणात एकीकडे भूकंप घडत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र पुण्यातील पालखी सोहळ्यात विठुरायाच्या गजरात दंग झाल्याचे पाहायला मिळाले. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन झाले. या वेळी भाजपकडून या दोन्ही पालखींचे स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुष्पवृष्टी करून, वारकर्‍यांना अभिवादन केले.

तसेच, वारकरी बांधवांना खाद्यपदार्थ आणि चादरींचे वाटपदेखील या वेळी केले. या वेळी ते टाळ-मृदगांच्या ठेक्यावर विठुरायाच्या गजरात दंग झाल्याचे पाहायला मिळाले. संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन दोन्ही पालख्यांचे सारथ्य केले. एकीकडे राज्यात शिवसेनेत पडलेली फुट आणि भाजप पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता असतानाच स्वत: प्रदेशाध्यक्ष पाटील मात्र विठुनामात दंग असल्याचे चित्र पुण्यात वारकर्‍यांना पाहायला मिळाले.

हेही वाचा

भेटी लागी जीवा; ‘ज्ञानोबा-तुकोबां’च्या पालखी दर्शनाने पुणेकरांना परमानंद!

पाथर्डी : अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य

98 वर्षांचे आजोबा निघाले पंढरीला; तरुणांनाही लाजवेल असा उत्साह अन् जोश

अब्दुल सत्तार भाजपसोबत आल्यास आपले काय ?; सिल्लोड भाजप पक्षासमोर पेच

Back to top button