न्यूयॉर्क : आता मानवी मेंदूतही बसवली जाणार चिप

न्यूयॉर्क : आता मानवी मेंदूतही बसवली जाणार चिप

न्यूयॉर्क : धडाडीचे उद्योजक एलन मस्क सतत नवे नवे प्रयोग करीत असतात. 'टेस्ला' आणि 'स्पेस एक्स' कंपन्यांचे मालक असलेल्या मस्क यांनी मंगळावर मनुष्य वसाहत निर्माण करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. आता त्यांची न्यूरोटेक स्टार्टअप 'न्यूरालिंक'ने ब्रेन -कॉम्प्युटर इंटरफेस टेक्नॉलॉजीची माणसावर चाचणी करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.

कंपनी 'ब्रेन -चिप'ला पुढील टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी तयार असून माणसाच्या मेंदूत अशी चिप बसवली जाणार आहे. यापूर्वी माकड व डुकरांवर या चाचण्या झालेल्या आहेत. एका नऊ वर्षांच्या माकडाच्या मेंदूत ही चिप बसवण्यात आली होती. त्याद्वारे हे माकड चक्‍क व्हिडीओ गेम खेळत होते.

हे स्टार्टअप तंत्रज्ञानाचा वापर करून ह्युमन-एआय सिम्बायोसिस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. एलन मस्क यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की मानवावर याच्या सुरुवातीच्या चाचण्या 2022 मध्ये सुरू होतील. चाचणीत अर्धांगवायू झालेल्या लोकांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. याद्वारे कॉम्प्युटर कर्सरचे थेट न्यूरल कंट्रोल गेन करण्याचा प्रयत्न केला जाईल.

मस्क यांच्या म्हणण्यानुसार ही चिप म्हणजे एक नाण्याच्या आकाराचे उपकरण आहे. ब्रेन डिसऑर्डर व तत्सम आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना सहाय्य करणे हा या तंत्रज्ञानाचा हेतू आहे. मेंदू आणि मणक्याची समस्या केवळ या चिपच्या मदतीने सोडवता येऊ शकेल. या ब्रेन चिपची क्षमता मोठी असल्याचा मस्क यांचा दावा आहे. त्यानुसार या चिपमुळे अर्धांगवायू, कर्णबधिरता, अंधत्व आदी समस्यांवर उपाय मिळू शकेल.

हेही वाचलतं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news