लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी - पुढारी

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करीत तिनदा गर्भपात करणाऱ्या संशयितास मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. गणेश राजाराम भोसले (३४, रा. खोडे नगर) असे या संशयिताचे नाव आहे.

३० वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश याने सप्टेंबर २०१२ ते जानेवारी २०२२ दरम्यान लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केला. पीडितेस नकळत मद्य पाजून तिची अश्लिल चित्रफीत काढून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी गणेशने दिली. त्यानंतरही गणेशने पीडितेवर वारंवार अत्याचार करून तिन वेळेस गर्भपात केला व तिच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गणेश विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button