व्हिडिओ : डेव्हिड वॉर्नर श्रीवल्ली गाण्यावर थिरकला, अल्लू अर्जुनलाही आवरला नाही कमेंटचा मोह! - पुढारी

व्हिडिओ : डेव्हिड वॉर्नर श्रीवल्ली गाण्यावर थिरकला, अल्लू अर्जुनलाही आवरला नाही कमेंटचा मोह!

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याचं (David Warner) भारतावरील प्रेम जगजाहीर आहे. हे प्रेम तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. डेव्हिड वॉर्नर नेहमीच क्रिकेट शिवाय बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील डान्स- डायलॉगचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करतो. आता तर डेव्हिड दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ‘पुष्पाः द राइज’ (Pushpa: The Rise) चित्रपटाच्या प्रेमात पडलाय. त्याने इन्स्टाग्रामवर श्रीवल्ली गाण्यावरील डान्सच्या स्टेप्सचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

डेव्हिड वॉर्नर यानं पुष्पा मधील श्रीवल्ली (Srivalli) गाण्यातील हुक स्टेप कॉपी केली आहे. यात डेव्हिड हुक स्टेप्सवर थिरकताना दिसून येत आहे. अल्लू अर्जुनने श्रीवल्ली गाण्यात पायातून चप्पल निसटण्याची जी स्टेप्स केली आहे; तशीच हुबेहुब स्टेप्स डेव्हिडनं करण्याचा प्रयत्न केला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांसोबतचं क्रिकेटर आणि स्वतः अल्लू अर्जुनने कमेंट केली आहे. अल्लू अर्जुननं त्यावर स्माइली इमोजी शेअर केला आहे. अल्लू अर्जुनच्या या कमेंटनंतर वॉर्नरनं एक मागणी केली आहे. वॉर्नरनं म्हटले आहे की, ‘पुढील वेळी मी जेव्हा शहरात असेन त्यावेळी तू मला स्टेप्स दाखवं भाई अल्लू अर्जुन सामी सामी…’.

याआधी भारतीय स्टॉर ऑलराउंडर क्रिकेटर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हणत याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहून जडेजाच्या चाहत्यांना त्याचा हा अंदाज खूप पंसद आला आहे. ‘पुष्पा पुष्पराज, मै झुकेगा नही साला…’ असा हा डायलॉग आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी त्याला चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

 

Back to top button