सचिन तेंडुलकरच्या सर्वात मोठ्या चाहत्याला पोलिसांनी केली मारहाण; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण - पुढारी

सचिन तेंडुलकरच्या सर्वात मोठ्या चाहत्याला पोलिसांनी केली मारहाण; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

मुझफ्फरपूर, पुढारी ऑनलाईन : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा चाहता सुधीर कुमार याला जिल्ह्यातील टाऊन पोलिस स्टेशनमध्ये एका पोलिसाने बेदम मारहाण केली आहे. सुधीर कुमार यांनी हा आरोप केला आहे, त्यानंतर हे प्रकरण संवेदनशील होत असल्याचे पाहून पोलिस कॅप्टन एसएसपी जयंत कांत यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. सचिन तेंडुलकरला ओळखणारे सर्व लोक त्याच्या फॅन्सलाही चांगलेच ओळखतात.

संपूर्ण प्रकरण काय आहे ?

सुधीर कुमार सांगतात की, ते शहर पोलीस ठाण्यात गेले होते. तेथे पोलीस ठाण्यातील एका लिपिकाने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्याच्या पायावर दोन लाथा मारून शिवीगाळ करून पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. या घटनेनंतर सुधीर कुमार यांनी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक : अखिलेश यादव करहलमधून निवडणूक लढवणार

सुधीरचा चुलत भाऊ पोलिसांच्या ताब्यात

एका प्रकरणात गुरुवारी रात्री उशिरा सुधीर कुमार यांच्या चुलत भाऊ किशन कुमार याला टाऊन पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी सुधीर दामोदरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना याबाबत माहिती दिली. तसेच पोलिस किशनला घेऊन गेल्याचे सांगितले. पोलीस प्रकरण काय आहे ते सांगत नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळताच सुधीरने टाऊन पोलीस ठाणे गाठले असता त्यांना भाऊ एका खोलीमध्ये बंद असल्याचे दिसले. सुधीर कुमार पोलिसांना कोणत्या प्रकरणात भावाला पकडले आहेत, अशी विचारणा करू लागले.

वीज बिल कमी करण्याचा पर्याय झाला आणखी सोपा, जाणून घ्या मोदी सरकारने काय केली घोषणा

पोलिसांकडून भावाच्या एका मित्राने जमीन खरेदी केल्याचे सांगण्यात आले. त्यात त्यांचे नाव साक्षीदार म्हणून देण्यात आले होते. कदाचित त्या जमिनीचा काही वाद झाला असावा. त्यातच एका पक्षाने एफआयआर दाखल केला होता. त्यांच्या भावाला याबद्दल काहीच माहिती नाही. तरीही पोलिसांनी त्याला पकडून आणले आहे. सुधीर आपल्या भावाशी बोलत असताना रागाच्या भरात एका पोलिसाने त्यांना बाहेर येण्यास सांगितले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुधीरने विरोध केला असता त्यांना पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली.

Bill Gates : संशोधन आणि विकासावर केली जाणारी गुंतवणूक आपलं आयुष्य वाचवू शकते

सुधीर यांनी केले होते या पोलीस ठाण्याचे उद्घाटन 

सुधीर म्हणाले की, हे माझे दुर्दैव आहे. काही वर्षांपूर्वी ही पोलिस ठाण्याची इमारत नवीन बांधली गेली. त्यावेळी त्यांना सेलिब्रेटी म्हणून उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते. त्याचे उद्घाटनही त्यांनी फीत कापून केले. पण आज त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

Back to top button